काळबादेवी आग दुर्घटनेतील ‘शहीदां’च्या कुटुंबियांना पालिका घर देणार

500

काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेत शहीद झालेल्या पालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना पालिका विनामूल्य घर देणार आहे. याशिवाय संबंधित ‘शहीदां’च्या कुटुंबातील एकाला शैक्षणिक अर्हतेनुसार पालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीही देण्यात येणार आहे. तसेच शहीदांच्या दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन खर्चही पालिका करणार आहे.

काळबादेवी जुनी हनुमान गल्ली येथील गोकुळ निवास या इमारतीला  9 मे 2016 रोजी भीषण आग लागली होती. यावेळी जिवाची बाजी लावून बचावकार्य सुरू असतानाच इमारतीचा भाग कोसळून जळणाऱ्या ढिगाऱ्याखाली तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन सुधीर अमिन, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे, केंद्र अधिकारी महेंद्र देसाई हे अडकले गेले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान या चारही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना शहीद घोषित करण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना शहीदांना कुटुंबीयांना मिळणाऱ्या सुविधा लवकरात लवकर देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या निधीतून या सवलती देण्यात येणार आहे.

अशा देणार सुविधा

  • शहीद अधिकाऱ्यांच्या  निवासी जिह्यात त्या विभागातील पसंतीच्या ठिकाणी एक सदनिका विनामूल्य (ज्या ठिकाणी म्हाडाची योजना असेल).
  • सदनिका उपलब्ध नसेल तर अनुज्ञेय क्षेत्रफळानुसार 3000/- प्रतिचौरस फूट दराने रोख रक्कम. अ वर्ग – 1000 चौ.फू., ब वर्ग – 800 चौ.फूट, क वर्ग – 750 चौ. फूट तर ड वर्ग असल्यास 600 चौ.फूट.
  • 25 लाख सानुग्रह अनुदान कायदेशीर वारसदारांच्या संयुक्त नावाने मुदत ठेव म्हणून देण्यात येईल. हा निधी 10 वर्षांपर्यंत काढता येणार नाही. व्याज रक्कम दर महिन्याला देण्यात येईल.
  • अधिकारी-कर्मचारी शहीद झाल्याच्या दिनांकापासून निवृत्तीच्या दिवसापर्यंत कुटुंबीयांना वेतन आणि वेतन सुधाराचे लाभ.
आपली प्रतिक्रिया द्या