CCTV – वीस मिनिटात सोनसाखळी चोरट्यांना पकडले

956
chain-snature-nashik

जेलरोड परिसरातील एका महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांना उपनगर पोलिसांच्या बीट मार्शलने अवघ्या 20 मिनिटात पकडले.

जेलरोड येथून पायी जाणाऱ्या महिलेची 75 ग्रॅम वजनाची सोनसाखळी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळविली. याबाबतची माहिती वायरलेसद्वारे प्राप्त होताच बीट मार्शल पोलीस नाईक दिनेश महाजन व समीर चंद्रमोरे यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. अवघ्या 20 मिनिटात जयभवानी रोडवरील जगताप मळ्याजवळ दोन्ही चोरट्यांना पकडण्यात त्यांना यश आले, अशी माहिती उपनगर पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या