मंदीत चांदी! कोल्हापुरात शेतकऱ्याला सापडला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा

13157

शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटातील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करताना चक्क सोन्याच्या नाण्यांनी भरलेला खजिनाच सापडला. विनायक बाबासो पाटील असे या नशीबवान शेतकऱ्यांचे नाव आहे. राष्ट्रीय संपत्ती म्हणुन हा पुरातन खजिना या शेतकऱ्याने प्रामाणिकपणे प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे.

img-20200528-wa0017

अणुस्कुरा घाटातील गट नंबर 186 मध्ये शेतात मशागत केल्यानंतर काजूची लागवड करताना बुधवारी रात्री एका मातीच्या मडक्यात अनेक वर्षांपूर्वी जमिनीत पुरून ठेवलेला हा खजिना सापडला. ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने सापडलेली सर्व नाणी प्रशासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला. त्यानुसार काल रात्रीच प्रशासनाकडून रितसर पंचनामा करून ही प्राचीन सुवर्ण नाणी ताब्यात घेण्यात आली.

img-20200528-wa0014

दरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या घरातून 716 गुप्तधन नाणी पंचनामा करून ताब्यात घेऊन, तहसील कार्यालयात लॉकरमध्ये सीलबंद करून ठेवलेली आहेत. 2 सेमी व्यास व 2 मि.मि. जाडीची ही चांदी व सोन्याची नाणी असल्याची माहिती शाहुवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या