अबब! इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ

तुम्ही शीर्षक वाचून गोंधळात पडला असाल ना? सध्या सोन्याचे भाव वाढलेले असताना दागिने बनवायचं सोडून सोनं खाण्याचा विचार कोण करेल? पण, हो हे खरं आहे. या जगात एक हॉटेल असं आहे, जिथे सोन्याचं आईस्क्रीम मिळतं.

हे हॉटेल दुबई या देशात आहे. अर्थात दुबई म्हटल्यानंतर तिथल्या राहणीमानाची कल्पनाच न केलेली बरी. तिथल्या एका कॅफेमध्ये हे सोन्याचं आईस्क्रीम मिळतं.

या आईस्क्रीमचं नाव ब्लॅक डायमंड असं आहे. हे आईस्क्रीम स्कूपी कॅफे नावाच्या कॅफेत मिळतं. या आईस्क्रीममध्ये मादगास्कर येथील विशेष असलेल्या व्हॅनिलापासून बनवलेलं आईस्क्रीम असतं.

व्हॅनिलाच्या स्कूपवर अस्सल 23 कॅरेट सोन्याचा वर्ख टाकला जातो. थोडाथोडका नव्हे तर भरपूर. त्यावर इराणी केशराच्या काड्या आणि ब्लॅक ट्रफलही असतं. या आईस्क्रीमची किंमत 60 हजार रुपये इतकी आहे.

हे आईस्क्रीम सर्व्ह करण्यासाठी देखील वर्साचे या प्रसिद्ध ब्रँडचा कप दिला जातो. या आईस्क्रीमचा व्हिडीओ एकेकाळची अभिनेत्री आणि सध्या ट्रॅव्हल व्लॉगर म्हणून प्रसिद्ध असलेली शहनाज ट्रेझरीवाला हिने तिच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यात या आईस्क्रीमची चव खूपच छान असल्याचं तिने म्हटलं आहे.

तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी इतकी किंमत ऐकून एक अख्खी टपरी इतक्या किमतीत विकत घेता येईल असं म्हटलं आहे. तर काही जणांनी या किमतीत दुबईची ट्रीप देखील प्लान करता येईल असं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या