बनावट सोने तारण प्रकरणी आंणखी  १५ कर्जदारांवर गुन्हा दाखल

47

सामना ऑनलाईन । मालवण 

विदर्भ-कोकण ग्रामीण बँक शाखा चौके येथे बनावट सोने ठेवून २३ लाख रुपये कर्जाची उचल करुन बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी सोनार कुणाल प्रभुलिकर यांच्यासह उर्वरीत १५ कर्जदार यांच्या विरोधात शनिवारी सायंकाळी मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सोनार प्रभुलिकर यांच्यासह ९ कर्जदार यांच्या विरोधात ३० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या सोनारासह एकूण २४ कर्जदारांनी बँकेत तब्बल ४ किलो बनावट दागिने ठेवून ५३ लाख ९४ हजार रुपये कर्जाची उचल करुन बँकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही कर्जदार यानी पैसे भरल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. अन्यथा फसवणुकीचा आंकड़ा ७० लाखाच्या घरात होता,असे तक्रारदार व  बँक व्यवस्थापक कमलाकर धुरी यांनी दिली.

दरम्यान, कर्जदार आरोपींना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरु झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली. मात्र मुख्य आरोपी सोनार कुणाल प्रभुलीकर हा फरार असुन त्याचा शोध पोलिसांककडून सुरु असल्याचे सांगण्यात आले. पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्यानंतर बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या कर्जदार नातेवाईक यांच्यात खळबळ उडाली आहे.

१५ कर्जदार यांच्यावर गुन्हे दाखल

प्रशांत कृष्णा धुरत, रेवतळे (६५.९२० ग्रॅम ), मंदार उल्हास परब, मेढा (६०.६००) इम्रान चांद खान, सोमवारपेठ (८४.३७० ग्रॅम ) भास्कर अनिल आचरेकर, कोळंब भटवाडी (८३.५५० ग्रॅम ) हेमकांत उत्तम लाड, कोळंब (६०.७०० ग्रॅम ) भूषण पांडुरंग पांगे, मेढा मालवण (७८.२१० ग्रॅम ), चेतन विलास मुणगेकर, रेडकर हॉस्पिटल मालवण (८१.५४० ) विशाल रमेश मोडक, राजकोट (८९. १९० ग्रॅम ), शैलेश जगन्नाथ कदम, आंबडोस ( ७५.५०० ग्रॅम ), भूषण सुभाष चौकेकर, चौके (४७.५५० ग्रॅम ), मनोज मोहन ठोंबरे, साळेल (७०.७०० ग्रॅम ), उमेश राजाराम डिचवलकर, देऊळवाडा ( १५४.५०० ग्रॅम ) देवेंद्र सुभाष परब, मेढा मालवण ( ४९७.३० ग्रॅम ), राजेंद्र रवींद्र खांदारे, मेढा (३४७.५०० ग्रॅम ) यांच्यावर भादवी कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ लाख २७ हजार रुपये कर्जाची उचल करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या