सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने…

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम झाला. या युद्धामुळे गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. तर सोन्या- चांदीच्या दरात वाढ झाली होती. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 51 हजारावर गेले होते. तर शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे, रशिया- युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाचे दर, जागतिक बाजार आणि शेअर बाजाराचा सोन्याचांदीच्या दरावर परिणाम होतो.

रशिया युक्रेन युद्ध आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे गुरुवारी सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी सोन्याचांदीच्या गरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 51 हजाराच्या खाली आले आहेत. शुक्रवारी सोन्याच्या दरात गुरुवारच्या तुलनेत 1274 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात गुरुवारच्या तुलनेत 2219 रुपयांची घट झाली आहे.

या घरसणीमुळे सराफा बाजारात सोन्याचे दर शुक्रवारी 10 ग्रॅमसाठी 50,913 रुपये होते. तर एक किलो चांदीचे दर 64,809 रुपये आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 52,187 रुपये होते. चांदीच्या दरातही शुक्रवारी 2219 रुपयांची घट झाली आहे. चांदीच दर शुक्रवारी एका किलोसाी 64,809 रुपये होते. तर गुरुवारी सराफा बाजारात चांदीचे दर 67,028 रुपयांपर्यंत पोहचले होते.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सोन्या-चांदीच्या दरात आगामी काळात चढ-उतार कायम राहतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आगमी काळात रशिया-युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास सोन्याचांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.