
अमेरिका, युरोपमध्ये बँकिंग क्षेत्रात संकट आले आहे. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये मंदी आली आहे. देशातील शेअर बाजारातही अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्या-चांदीत गुतंवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेस सोन्याला झळाळी आली असून सोन्याला विक्रमी दर मिळत आहे. सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 1400 रूपयांनी महागले अशून 60 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहचले आहे. सोन्यातील गुतंवणूक फायद्याची ठरत असल्याचे दिसत आहे. गेल्या 17 वर्षात सोन्याची किंमत सहापटीने वाढली आहे.
शेअर बाजारात मंदी असताना गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्याचे दर वाढतात. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे बाजाराला आधार मिळतो. आठवड्याभरापूर्वी 55 हजार रूपये प्रति 10 ग्रॅम असलेले सोने आता ६० हजार रुपयांवर गेले आहे. सोन्याच्या दरात 17 वर्षांत झालेली वाढ सहापट आहे. 5 मे 2006 रोजी सोने 10 हजार रूपये, 6 नोव्हेंबर 2010 रोजी सोने 20 हजार रूपये, 1 जून 2012 रोजी सोने 30 हजार रूपये प्रति 10 ग्रॅम होते. 3 जानेवारी 2020 सोने 40 हजारावर पोहचले होते. 22 जुलै 2020 रोजी सोने 50 हजार प्रति तोळा होते. तर 20 मार्च 2023 रोजी सोने 60 हजाराच्या टप्प्यात पोहचले आहे.
येत्या काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात. सोन्याचा दर महिन्याभरात 62 हजार रूपये प्रति 10 ग्रॅम इतका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मार्च 2023 मधला हा सोन्याचा विक्रमी दर ठरला आहे. अनेक केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. जगावर मंदीचे ढग आहेत. बँकिंग क्षेत्रात संकट आलं आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढत आहे.