सोने 73 हजारांपार, चांदीही चमकली

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. शुक्रवारी 22 कॅरेटच्या एका तोळ्याच्या सोन्याची किंमत 210 रुपयांनी वाढून 67 हजार 150 रुपयांवर पोहोचली, तर 24 पॅरेट सोन्याचा भाव 220 रुपयांनी वाढून 73 हजार 250 रुपयांवर पोहोचला. चांदीच्या किमतीसुद्धा 88 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 67050 रुपये, तर 24 पॅरेट सोन्याची किंमत 73150 रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.