सोन्याने रेकॉर्ड तोडला, 39 हजारांच्या पार

863

सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दराने प्रति तोळा 39 हजारांचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत गुरुवारी सोन्याच्या भावात 150 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे दर 38970 रुपये इतका झाला. चांदीच्या किमतीतही 60 रुपयांची वाढ होऊन ती 45100 च्या पार पोचली आहे. सोन्याच्या दरातील ही वाढ बघता लवकरच सोने 40 हजारांचा पल्ला गाठणार अशी चिन्हे दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या