सोन्या-चांदीला झळाळी; दर वधारले, सराफ बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किमतीत झालेल्या सुधारणांमुळे आणि रुपयाच्या किमतीत झालेली घट यामुळे स्थानिक बाजारात सोमवारी सोन्याचे भाव वधारले आहेत. सोन्यात तब्बल 310 रुपये इतकी वाढ झाली आहे.

या वाढीमुळे सोन्याचा दर प्रति तोळा (प्रति 10 ग्रॅम) 46,580 रुपये इतका झाला झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. याआधी सोन्याचा भाव 46,270 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

सोन्याच्या दराच्या सोबत चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव 580 रुपयांच्या तेजीने 67,429 रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. याआधी चांदीचा दर 66,849 रुपये इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कारभाराला सुरुवात होताच डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी घसरला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 74.33 रुपये इतका खाली गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या