सोने-चांदीच्या दरात आजही मोठी घसरण, सोने 50 हजारांच्या खाली, तर चांदी झाली 2800 रुपये स्वस्त

बुधवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच 50 हजारांच्या खाली आला, तर चांदीचा दर देखील 60 हजारांच्या खाली आला आहे. ऑगस्ट महिन्यात सोने 56 हजार, तर चांदी 75 हजारांवर गेली होती. मात्र गेल्या काही दिवसात हा दर खाली येताना दिसतोय.

सोन्याची मागणी कमी झाल्याने बुधवारी सराफा बाजारात सोन्याचा दर 683 रुपयांनी पडला आणि 10 ग्राम (1 तोळा) सोन्याचा दर 489 हजार 698 रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात 2 हजार 812 रुपयांची घसरण झाली असून 1 किलो चांदी 58 हजार 401 रुपयांना मिळत आहे.

gold4

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव पडला आहे. 2000 डॉलरवर पोहोचलेला सोन्याचा दर आता प्रति औस 1 हजार 879.30 डॉलर झाला आहे. तर चांदीची किंमत देखील प्रति औस 23.43 डॉलरवर स्थिरावली आहे.

gold

... म्हणून घसरण
कमोडिटी मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याने सोन्याचा दर सातत्याने कमी होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोने 56 हजारांवर तर चांदी 75 हजारांवर पोहोचली होती. मात्र गेल्या दोन महिन्यात सोने 8 हजार तर चांदी 16 हजार रुपयांनी खाली आली आहे. आगामी काळात हे दर आणखी पडण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या