पुणे – फुरसुंगीत दुध डेअरीतून जेष्ठ महिलेचे दागिने लांबविले

492

दुध डेअरीतील एका जेष्ठ महिलेचा विश्वास संपादित करुन दोघा चोरट्यांनी त्यांच्याकडीत 23 हजारांचे दागिने चोरुन नेल्याची घटना फुरसुंगीत घडली. याप्रकरणी गौराबाई डोळे (वय – 57) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौराबाई यांची फुरसुंगीतील गुरुदत्त कॉलनीत दुधडेअरी आहे. काल दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास त्या डेअरीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी डेअरीत प्रवेश करुन विश्वास संपादित केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील 500 रुपयांची नोट देवासमोर ठेवायला सांगितली. काही वेळाने पुन्हा 500 रुपयांची नोट ताब्यात घेऊन चोरट्यांनी गौराबाई यांना गळ्यातील बोरमाळ आणि सोनसाखळी काढण्यास सांगितले. सर्व दागिने नोटेत गुंडाळल्यानंतर चोरट्यांनी डेअरीतून पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गाडे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या