Photo – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क

रशियामध्ये एका ट्राफिक पोलिसाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. छापेमारीमध्ये ट्राफिक पोलिसाच्या घरातून एवढे घबाड मिळाले की ते पाहून अधिकारीही थक्क झाले.

gold-toilet-1

या अधिकाऱ्याच्या घरामध्ये सोन्याचे टॉयलेट होते आणि बाथरुममध्ये जगातील सर्वात महाग संगमरवर फरशी होती. ‘द मॉस्को टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

gold-toilet-3

वृत्तानुसार, ट्राफिक पोलीस कर्नल अॅलेक्सी सफोनोव्ह याला अटक करण्यात आली असून आरोपांमध्ये दोषी आढळल्यास त्याला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

gold-toilet-5

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या घराबाहेर अनेक लक्झरी कार पार्क केल्याचे आढळले.

gold-toilet-2

घरातील फर्निचर, फोटो फ्रेम आणि सजावटीमध्येही या ट्राफिक पोलिसांना सोन्याचा वापर केला होता. तसेच स्वयंपाकघरातील फर्निचर आणि झोपण्याच्या खोलीतील सामानही सोन्याचा वापर करून बनवण्यात आले होते.

gold-toilet-4

आपली प्रतिक्रिया द्या