प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्सला अटक आणि सुटका

42

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स नशेत वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडामध्ये वुड्सला अटक करण्यात आली. वुड्सवर मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचा आरोप आहे. दरम्यान, अटकेनंतर काही तासांत त्याची सुटका करण्यात आली आहे.

गोल्फ खेळामध्ये विश्वविजेता राहिलेल्या वुडसने सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास नशेत गाडी चालवत असताना दक्षिण फ्लोरिडातून पोलिसांनी त्याला अटक केली. टायगर वुड्सने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची वुड्सची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २००९ मध्ये नशेत वाहन चालवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याने विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली देत पत्नीची जाहीर माफीदेखील मागितली होती.

आपली प्रतिक्रिया द्या