धक्कादायक! 120 विद्यार्थ्यांना गुराढोरांसारखं टेम्पोमध्ये कोंबल, विद्यार्थी पडले बेशुद्ध

गोंदियामध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्यांना खेळांच्या स्पर्धांसाठी  दुसरीकडे घेऊन जाताना अक्षरश: एका टेम्पोत कोंबले. टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं कोंबल्याने मुले घुसमटली आणि बेशुद्ध पडली. त्यांना उपचारासाठी एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर त्यातील एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील 120 आदिवासी मुलं मुली खेळांच्या स्पर्धांसाठी तिरोडा तालुका येथील कोयलारी या आश्रम शाळेत जात होते. तिथे जाण्यासाठी टेम्पो करण्यात आला होता. या टेम्पोत 120 मुलांना अक्षरश: कोंबले होते. मात्र तिथून परतानाही तिच अवस्था होती. कोंबल्यामुळे मुलं घुसमटली आणि काही मुलं-मुली टेम्पोमध्येच बेशुद्ध पडली. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आण्यात आले असून त्यातील एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

निष्कृष्ट जेवणामुळे मुलांची प्रकृती खराब, शिक्षकांनी केला आरोप

गोंदिया तालुक्यातील मजीदपूर येथील शासकीय आश्रम शाळा येथील 120 मुलं शनिवारी कोयलारी येथील आदिवासी आश्रम शाळा खेळाच्या स्पर्धेसाठी गेले होते. त्यावेळी 120 मुला- मुलींना एका टेम्पोमध्ये कोंबून नेण्यात आले होते. तर त्या सर्व मुलांनी कोयलारी येथील आश्रम शाळेत जेवण केले. मात्र ते जेवण निष्कृष्ट दर्जाचे होते. त्या जेवणामध्ये अळ्या निघाल्याचेही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले होते. असा आरोप मजीतपूर येथील शासकीय आश्रम शाळेचे क्रीडा शिक्षक नरेंद्र लील्हरे यांनी केलेला आहे.

जेवणानंतर प्रकृती झाली खराब

आम्ही सगळे विद्यार्थी तिरोडा तालुका येथील कोयलारी शासकीय आश्रम शाळेत खेळांच्या स्पर्धेसाठी गेलो होतो. दरम्यान साधारण 10 च्या सुमारास आम्हाला नाश्ता देण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता जेवण देण्यात आले आणि सायंकाळी परतत असताना अचानक टेम्पोमध्ये आठ ते दहा मुला मुलींची प्रकृती बिघडली. त्यावेळी तत्काळ टेम्पो हा एकोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळविण्यात आला आणि त्यांना उपचारासाठी नेण्यात आल्याचे विद्यार्थी नितु पूषाम हिने सांगितले.