Gondia News: वाढीव वीज बिल संदर्भात शिवसेनेचे आंदोलन, काढली इलेक्ट्रिक उपकारणांची शवयात्रा

वाढीव वीज बिलासंदर्भात आज गोंदियात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने इलेक्ट्रिक उपकरणांची शवयात्रा काढत उप विभागीय कार्यलयात नेत निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त विजेचे उत्पादन विदर्भात होत असून इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त वीज दर हे महाराष्ट्रात असून वीज बिलावरील कर आकरांनी कमी करण्यात यावी. सोबतच ‘आम्हाला लाडकी बहीण योजना नको वीज स्वस्त दारात उपलब्ध व्हावी’ या साठी महिलांनी देखील या प्रतिकात्मक शवयात्राते हजेरी लावली. यावेळी वीज वितरण कंपनी तसेच मिंधे सरकारचा निषेध करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काढलेली ही शवयात्रा गोंदिया शहरात फिरवत उप विभागीय कार्यलयात नेण्यात आली असून या शवयात्रेचा समारोप करीत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पंकज यादव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख, हरीश तुळसकर युवासेना जिल्हा प्रमुख ललिता यादव शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.