गोंदियात 120 मुलांना एका ट्रकमध्ये कोंबले, मुख्याध्यापक निलंबित

गोंदियामध्ये एका ट्रकमध्ये तब्बल 120 विद्यार्थ्यांना जनावरांप्रमाणे कोंबल्याची संतापजनक घटना घडली. दाटीवाटीमुळे श्वास गुदमरल्याने यापैकी अनेक मुले बेशुद्ध पडली. या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य पेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आले. कोयलारी इथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.

गोंदिया येथील मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी न्यायचं होते. यासाठी विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत नेताना ट्रकमधून नेण्यात आले. या विद्यार्थ्यांना नेताना हलगर्जीपणा झाल्याचं उघड झाले. ट्रकमध्ये श्वास गुदमरुन विद्याथी बेशुद्ध झाल्याने या विद्यार्थ्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करीत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेवुन जाणे चुकीचे असुन अशा प्रकार पुन्हा खपवून घेतला जाणार नसल्याचे संकेत देत या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी दिले आहे.