2019 मध्ये नेटकऱ्यांनी ‘या’ 10 व्यक्तींचा घेतला सर्वाधिक शोध, वाचा सविस्तर…

2019 हे वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर गूगल इंडियाने हिंदुस्थानमध्ये 2019 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या 10 व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये हिंदुस्थानी वायूसेनेचे जाँबाज विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) पहिल्या स्थानावर आहेत. अभिनंदन वर्धमान यांच्यासह गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar), युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि रानू मंडल (Ranu Mondal) यांच्याही नावांचा यामध्ये समावेश आहे.

सर्वाधिक सर्च केलेल्या 10 व्यक्ती –

1. अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) –

abhinandan-varthaman
जम्मू-कश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या वायूसेनेने हिंदुस्थानवर प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मीग-21 विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले, परंतु या दरम्यान त्यांचे विमान कोसळले आणि ते पाकिस्तानच्या हातात सापडले. हिंदुस्थानच्या दबावापुढे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली आणि अवघ्या 60 तासांमध्ये त्यांची सुटका करावी लागली.

2. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) –

lata-f
गूगल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव आहे. नोव्हेंबरमध्ये लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासून त्यांचे नाव गूगलवर सर्वाधिक सर्च केले जात आहे. या दरम्यान, लता मंगेशकर यांच्या मृत्यूच्याही अफवा पसरल्या होत्या. परंतु लतादीदींच्या नातलग रचना यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आणि त्यांच्या चांगल्या तब्येतीची कामना करण्याचे आवाहन केले. दरम्यान, 20 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

3. युवराज सिंह (Yuvraj Singh) –

yuvi2
टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि 2011 च्या विश्वचषकाचा नायक युवराज सिंह याने याच वर्षी क्रिकेटला रामराम केला. 10 जून, 2019 ला युवराजने 17 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम दिला. यानंतर सोशल मीडियावर युवराज सिंहबाबत भावूक मेसेजचा पाऊस पडला. तसेच सोशल मीडियावरही त्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली.

4. आनंद कुमार (Anand Kumar) –

anand-kumar
ऋतिक रोशन याची प्रमुख भूमिका असणारा सुपर-30 हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित झाली. विकास बहल यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. तेव्हापासून आनंद कुमार यांचे नाव 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले.

5. विकी कौशल (Vicky Kaushal) –

vicky-kaushal-in-uri-movie
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरी’, ‘संजू’ आणि ‘मनमर्झीया’ या चित्रपटांद्वारे चर्चेत आलेला अभिनेता विकी कौशल 2019 मध्ये आलेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. या चित्रपटात विकी कौशलने मेजर विहान सिंह शेरगील यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला बेस्ट अॅक्टरचा नॅशनल अवॉर्डही मिळाला.

6. ऋषभ पंत (Rishabh Pant) –

rishabh-pant
टीम इंडियाचा तरुण खेळाडू ऋषभ पंत याला महेंद्रसिंह धोनी याचा वारसदार म्हणून पाहिले जाते. परंतु तो लगादार चांगले प्रदर्शन करण्यात अयशस्वी ठरत आहे. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत पंतने अत्यंत खराब प्रदर्शन केले. यानंतर सोशल मीडियावर #DhoniWeMissYouOnField हा हॅशटॅग वापरला गेला.

7. रानू मंडल (Ranu Mondal) –

ranu-mandal-22
रानू मंडल यांनी रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गायले आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला मुंबईत तिला एका कार्यक्रमात गाण्याची संधीही मिळाली. तसेच गायक हिमेश रेशमिया याच्यासोबत तिने काही गाणीही गायली. तिचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. गूगल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीत रानू मंडल यांचे नाव सातव्या स्थानावर आहे.

8. तारा सुतारिया (Tara Sutaria) –

tara-sutaria
गूगल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीत अभिनेत्री तारा सुतारिया हिचे नाव आठव्या स्थानावर आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मे महिन्यामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ताराने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत तिच्या अफेयरच्या चर्चाही सोशल मीडियावर चघळल्या गेल्या.

9. सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) –

siddharth-shukla
‘बिग बॉस-13’ मधील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक म्हणून सिद्धार्थ शुक्ला याचे नाव घेतले जाते. गूगल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीत त्याचे नाव नवव्या स्थानावर आहे. बिग बॉसच्या घरामधील त्याचे वर्तन वादग्रस्त ठरले असले तरी होस्ट सलमान खान याचा तो फेव्हरेट होता. बालिका वधूमधील अभिनेत्री शितल खांडाल हिच्यासोबतच्या त्याच्या वर्तनाचीही सोशल मीडियावर चर्चा झाली.

10. कोयना मित्रा (Koena Mitra) –

koena-mitra
गूगल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीत कोयना मित्रा हिचे नाव शेवटच्या स्थानावर असले तरी 2019 च्या सुरुवातीला तीचे नाव टॉपवर होते. जुलैमध्ये चेक बाऊन्सचे प्रकरण आणि त्यानंतर बिग बॉस-13 मध्ये स्पर्धक म्हणून उतरल्यानंतर तिचे नाव सर्वाधिक सर्च केले गेले.

आपली प्रतिक्रिया द्या