
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक सुमारे 12,000 नोकर्या कमी करणार आहे. कंपनीच्या एकूण कर्मचार्यांपैकी 6% कर्मचारी कपात असणार आहे. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी रॉयटर्ससोबत शेअर केलेल्या स्टाफ मेमोमध्ये म्हटले आहे की, कंपनीने अलीकडच्या काळात झपाट्याने वाढ केली आहे.
ते म्हणाले, ‘आम्ही येथे घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो’. प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने 10,000 कामगारांना कामावरून कमी करण्याचे म्हटल्यानंतर काही दिवसात कपात झाली.
Alphabet च्या नोकऱ्या कमी झाल्यामुळे अभियांत्रिकी उत्पादनांच्या अन्य कंपन्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मंदीचं हे संकट जागतिक आहे आणि अमेरिकेच्या कर्मचार्यांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
अल्फाबेटने कपात करण्यात येणाऱ्या कर्मचार्यांना आधीच ईमेल केले आहे, मेमोमध्ये म्हटले आहे की, स्थानिक रोजगार कायदे आणि पद्धतींमुळे इतर देशांमध्ये प्रक्रियेस जास्त वेळ लागेल.
दरम्यान, Google आणि Microsoft जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून ओळखल्या जाणार्या सॉफ्टवेअरच्या वाढत्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.