गुगलने खास डुडलद्वारे दिल्या मातृदिनाच्या शुभेच्छा

सामना ऑनलाईन । मुंबई

गुगल नेहमीच खास डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा आणि त्या दिवशीचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. यावेळीही गुगलने मातृदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे.

गुगलने मातृदिनाच्या निमित्ताने तयार केलेल्या डुडलमध्ये एक डायनासॉर आई आपल्या चिमुकल्यांसोबत चालताना दिसत आहे. आई नेहमीच आपल्या मुलांना मार्गदर्शन करत असते तसेच प्रोत्साहन देत असते, हेच या डुडलमध्ये दाखवण्यात आलं आहे. आपल्या मुलांवर निस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या जगातील सर्व मातांना मातृदिन समर्पित आहे.

मातृदिन हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. अमेरिकेमध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. १९०८मध्ये सर्वप्रथम अमेरिकेत मातृदिन साजरा केला गेला. त्यानंतर मग हळूहळू इतरही देशांत मातृदिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.