गुगलची हिंदुस्थानी चित्रकाराला ‘डूडल’च्या माध्यमातून मानवंदना

1

सामना ऑनलाईन । मुंबई

गुगलने डूडलच्या माध्यमातून जगविख्यात हिंदुस्थानी चित्रकार जामिनी रॉय यांना मानवंदना दिली आहे. यानिमित्ताने गुगलने जामिनी रॉय यांच्या १३० व्या जयंतीला सलाम करताना रॉय यांनी साकारलेल्या चित्राचे डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

विसाव्या शतकातील आधुनिक हिंदुस्थानी चित्रकारांमधील जामिनी रॉय हे एक आहेत. केवळ हिंदुस्थानच नाही तर संपूर्ण जगात आपला ठसा उमटवलेल्या मोजक्या हिंदुस्थानी चित्रकारांमध्ये रॉय यांचे नाव आवर्जून घेतलं जातं. जामिनी रॉय यांना चित्रकेलेतील त्यांच्या योगदानासाठी, १९५५ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

पश्चिम बंगालच्या बोलियातोर या खेड्यात ११ एप्रिल १८८७ रोजी जन्मलेल्या जामिनी रॉय यांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रकलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या चित्रांमध्ये ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. २४ एप्रिल १९७२ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.