गुगल ड्राइव्ह होणार बंद

गुगलने आपली ‘गुगल ड्राइव्ह’ ही सेवा लवकरच बंद करण्याची घोषणा केली असून तिला पर्याय म्हणून गूगलचीच ‘बॅकअप ऍण्ड सिंक आणि ड्राइव्ह फाइल स्ट्रीम’ ही दोन टूल्स वापरण्याचे आवाहन केले आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी गुगल ड्राइव्ह सेवा वापरणे बंद करण्यात येणार असून १२ मार्च २०१८ रोजी ही सेवा पूर्णपणे बंद होणार आहे. नव्याने दाखल करण्यात आलेले ‘ड्राइव्ह फाइलस्ट्रीम’ हे टूल हे पूर्णपणे व्यावसायिकांना समोर ठेवून बनवण्यात आलेले आहे. मात्र ‘बॅकअप ऍण्ड सिंक’ हे टूल सर्वसामान्य यूजर्सला अत्यंत उपयोगी असून आपल्या डेस्कटॉपमधली गाणी, व्हिडीओज्, फोटो अशा मल्टिमीडिया डाटासह विविध टेक्स्ट फाइल्स आणि इतर डाटा इथे सहजपणे साठवून ठेवता येणार आहे. तुम्ही तुमच्या संगणकातील संपूर्ण डाटाचा बॅक-अप इथे ठेवू शकाल एवढी याची क्षमता असणार आहे.