गुगल मॅप्सचे पार्किंग फीचर

66

हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग केल्यानंतर आता त्याच गुगल मॅपच्या मदतीने आपल्या गाडीसाठी पार्ंकग शोधणे आणि काही काळाने परत आल्यानंतर पार्ंकगच्या गर्दीतून आपण पार्क केलेल्या गाडीचे ठिकाण अचूक ओळखणे या दोन्ही गोष्टी सहजशक्य होणार आहेत. गुगल मॅप्सच्या नव्या आवृत्तीत हे फीचर देण्यात आले असून एकदा गाडी पार्क केल्यानंतर गाडीतून उतरताना मॅपवर दिसणाऱया निळ्या बिंदूवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘सेव्ह युवर लोकेशन’ असे ऑप्शन मिळेल. हे लोकेशन सेव्ह करावे लागणार आहे. आपले काम उरकून परत आल्यानंतर आता गर्दीतदेखील आपले हे लोकेशन तुम्हाला गुगल मॅप सहजपणे शोधून देण्याचे काम करेल. ऍण्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रकारच्या मोबाईलसाठी हे फीचर देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या