गुगलच्या काही मोबाईल सेवा बंद

49

येत्या तीन एप्रिलपासून गुगल कंपनी आपल्या गुगल डॉक्स, गुगल ड्राइव्ह, गुगल स्लाइडस् व गुगल शीटस् या सर्व सेवांच्या जुन्या आवृत्त्या अर्थात व्हर्जन्स मोबाईलसाठी बंद करणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉगपोस्टद्वारे याची घोषणा नुकतीच केली आहे. स्मार्टफोनवर या सेवा वापरत असलेल्या ग्राहकांनी आपले स्मार्टफोन्स अपडेट करून घ्यावेत अशी सूचनादेखील यात देण्यात आलेली आहे. आयओएस मोबाईल सिस्टिमसाठी गुगल डॉक्सची .२०१६.१२२०४, गुगल ड्राइव्हची ४.१६, गुगल शीट्सची १.२०१६.१२२०८ आणि गुगल स्लाइडस्ची १.२०१६.१२२०३ आवृत्ती बंद होणार आहे. अँड्रॉइडच्या मोबाईल्सकरिता गुगल स्लाइडस्ची १.६.२९२, गुगल डॉक्सची १.६.२९२, गुगल ड्राइव्हची २.४.३११ आणि गुगल शीटस्साठी १.६.२९२ या आवृत्त्या बंद करण्यात येणार आहेत. मोबईलसाठी या आवृत्त्या बंद होत असल्या तरी गुगलच्या या सेवा वेबसाइटद्वारे मात्र सुलभपणे वापरता येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या