लहानग्यांसोबत गुगल डुडलची अनोखी होळी

23

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरात साजऱ्या होणाऱ्या होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातोय. वेगवेगळ्या देशात भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे राहिलं असतं तरच नवल. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसोबत होळी खेळली आहे. गुगलचं पेज ओपन केल्यानंतर रंगात न्हाऊन निघालेलं डुडल नजरेस पडतं. गुगलवर लहानग्यांची टोळी रंगांची उधळण करत असल्याचं या डुडलमधून पाहायला मिळतं आहे.

यापूर्वीही गुगलने वेगवेगळ्या दिनविशेषांसाठी आगळी वेगळी आणि समर्पक डुडल्स तयार केली आहेत. या डुडल्सच्या माध्यमातून सेलिब्रेशन, स्मरण आणि आदरांजली वाहण्याच्या प्रयत्नाला नेटकऱ्यांनी नेहमीच दाद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या