ना टच, ना स्वाईप… आता डेबिट-क्रेडिट कार्डही होणार डिजिटल, Google Pay चं नवं फीचर

google-pay-card-digital

Google Pay अॅप आता केवळ UPI पेमेंट करण्यासाठी काम उपयोगी येईल असं नाही. तर याच्या कार्ड टोकनायजेशन फीचरमुळे लोक थेट आपल्या बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर पेमेंट करण्यासाठी वापरू शकतात. Google Pay ने नुकत्याच अनेक या फिचरद्वारे बँकांना जोडलं आहे.

कार्ड टोकनायजेशन फिचर एक प्रकारे आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डला डिजिटल बनवतो. ज्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी खरेदी केल्यावर पेमेंट करताना पीओएसवर स्वाइप किंवा टच करण्याची गरज पडणार नाही. तर डिजिटल पद्धतीनं पेमेंट करता येईल.

कार्ड टोकनायजेशन फीचरमुळे तुम्ही Google Pay अॅपवरच आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर Tap and Pay, Online किंवा QR Code द्वारे पेमेंट करण्यासाठी वापरू शकतात. हे फीचर तुमच्या फोनला कार्डसोबत एक सुरक्षित डिजिटल टोकनप्रमाणे जोडून देते.

Google Pay या फीचरमुळे तुम्ही 25 लाखाहून अधिक Visa मर्चंट लोकेशनवर आपल्या फोनमधून कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा थेट वापर करू शकतात. तर 15 लाखाहून अधिक ठिकाणी QR Code स्कॅनकरून पेमेंट करू शकतात.

या फीचरमुळे वीज, पाणी, मोबाईलचं बिल तुम्हाला डिजिटली भरता येईल. ऑनलाइन पेमेंट करण्याचा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध आहे.

Google Pay ने हे फीचर आता SBI, Indusind Bank आणि Federal Bank च्या डेबिट कार्डसह Indusind Bank आणि HSBC India च्या क्रेडिट कार्डच्या वापरासाठी जोडण्यात आलं आहे. तर याआधी SBI Cards चे क्रेडिट कार्ड आणि Kotak Mahindra Bank तसंच Axis बँकेच्या डेबिट-क्रेडिट कार्डला या फीचर सोबत जोडण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या