अफवा आणि चुकीच्या माहिती संदर्भात गूगल आक्रमक

31

इंटरनेटवर पसरविल्या जाणाऱ्या खोटय़ा बातम्या म्हणजेच फेक न्यूज आणि आक्षेपार्ह लिखाण यामुळे सर्वच मोठय़ा कंपन्या त्रस्त झालेल्या आहेत. आता गूगलने आपल्या ‘प्रोजेक्ट ओल’ द्वारे याविरुद्ध ठामपणे कारवाईचा इशारा दिला आहे. प्रोजेक्ट ओल हे प्रमुख तीन टप्प्यात काम करणार आहे.

१) सर्च रिमूव्हलसाठी नवे धोरण आणि सर्च सजेशनसाठी नवे फीडबॅक फॉर्म्स देण्यात येतील.

२) फीचर्स स्निपेट आन्सर्ससाठीदेखील फीडबॅक फॉर्म्स.

३) ठरावीक निकष लावून तपासलेल्या मजकुरालाच सर्च ऑप्शनमध्ये जागा देण्यात येईल.

आता गूगल सर्चमध्ये दिसणाऱया काही आक्षेपार्ह मजकुराचा फीडबॅक यूजर्सला देणे शक्य होणार असल्याने असा आक्षेपार्ह, हिंसक, चुकीचा मजकूर तात्काळ हटवणे गूगलला शक्य होणार आहे. गूगलच्या सर्च सजेशन्समुळे जगभरच वाद निर्माण होत असतात. या नव्या प्रोजेक्टने गूगल कितपत यश मिळवते ते आता बघायचे.

आपली प्रतिक्रिया द्या