संशयावरुन पत्नीच्या मित्राचा खुन करण्याच्या तयारीतील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्याच्याकडून धारधार शस्र जप्त करण्यात आले आहे. अरबाज उर्फ लॅब इलियाज खान( 24) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
युनिट पाचचे पोलीस निरीक्षक, उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, आश्रुबा मोराळे, दिपक लांडगे, राहुल ढमढेरे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते. त्यावेळी एकजण हातात सुरा घेऊन गुन्हा करण्याचे उद्देशाने लक्ष्मीनगर, कोंढवा, येथे उभा आहे अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अरबाजला ताब्यात घेतले. पत्नीस व त्याला त्रास देणाऱ्याला ठार मारण्यासाठी हत्यारासह चाललो आहे अशी कबुली त्याने दिली.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट पाचचे पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार,रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, दिपक लांडगे व राहुल ढमढेरे यांनी केली आहे
यापूर्वीच सहा गुन्हे दाखल
अरबाज रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याचेवर कोंढवा पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, मारहाण, दंगल यासारखे 6 गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या दंगलीचा व हत्यार घेऊन दुकाने बंद करुन दहशत पसरविणे या सारख्या दोन गुन्हया मध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.