
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये झालेल्या एका लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या या फोटोची चर्चा सर्वत्र भलतीच रंगली आहे.
गोरखपूर येथील बडहलगंज कोतवाली क्षेत्रातील छपिया उमराव गावात राहणारे कैलास यादव (70) आणि त्यांची सून पूजा (28) या दोघांनी मंदिरात जाऊन विवाह केला. वयोवृद्ध सासऱ्यासोबत सूनेने विवाह केल्याची गावात सर्वत्र चर्चा रंगली असतानाच त्यांच्या लग्नाचे व्हायरल झालेल्या फोटोमुळे सून-सासऱ्याच्या लग्नाला चांगलीच प्रसिद्धि मिळाली.
कैलास यादव बडहलगंज पोलीस ठाण्यात चौकीदार आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू 12 वर्षांपूर्वी झाला होता. कैलास यांना चार मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या सूनेचे दुसरे लग्न लावून दिले, मात्र तिथून ती पुन्हा तिच्या सासरी कैलास यादव यांच्या घरी राहू लागली. यादरम्यान सासऱ्यासोबत सूनेचे सूत जुळले आणि दोघांनीही मंदिरात जाऊन विवाह सोहळा पार पाडला.
या घटनेबाबत पोलीस अधिकारी जे. एन. शुक्ला यांनी दिलेली माहिती अशी की, कैलास आणि त्यांचा मुलगा पोलीस ठाण्यात पहारेकरी आणि फॉलोअरचे काम करतात. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या सून आणि सासऱ्याच्या लग्नाविषयी कैलास आणि त्यांच्या कुटुंबियांना विचारले असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. आजूबाजूच्या गावातील लोकं आणि शेजाऱ्यांचे हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, असे म्हणणे असून या घटनेबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.