मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लिमांना आरक्षण द्या, ओवैसींची मागणी

270

मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लीम समाजालाही आरक्षण द्यावे अशी मागणी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. भिवंडीतल्या एका सभेत ते बोलत होते.

सोमवारी भिवंडीत ओवैसी म्हणाले की “तिहेरी तलाक विरोधात कायदा केला तर मुस्लीम महिलांना न्याय मिळेल असे मोदींना वाटते. पण ते चुकीचे आहे. जर तुम्हाला खरंच मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर मराठा समाजाला जसे आरक्षण दिले तसेच आरक्षण मुस्लिम समाजाला द्या.” ओवैसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली.

ओवैसी म्हणाले की, “सागरात जेव्हा एखादी बोट बुडते तेव्हा बोटीचा कॅप्टन सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढतो. परंतु राहुल गांधी यांनी काँग्रेसची बुडणारी बोट सोडून पळ काढला आहे.” तसेच काँग्रेसच्या कृपेवर मुस्लिम जिवंत नाहिये. या देशाच्या संविधानामुळे आणि देवामुळे मुस्लीम समाज आजही जिवंत असल्याचे ओवैसी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या