सरकारी रुग्णालय, दवाखान्यांची औषधे, यंत्रसामग्री हाफकीन खरेदी करणार

40

सामना प्रतिनिधी । मुंबई

आरोग्य, वैद्यकीय शिक्षण यांच्यासह सर्वच शासकीय विभागांनी औषधे व यंत्रसामग्री हाफकीन महामंडळामार्फतच करावी. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

औषधे व यंत्रसामग्री खरेदीसंदर्भात ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण याबरोबरच आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, शासकीय मंडळांना लागणारी औषधे व यंत्रसामग्री यासाठी हाफकीन महामंडळामध्ये खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यापुढे कुठलाही विभाग औषध खरेदी हाफकीन महामंडळाक्यतिरिक्त अन्यत्र खरेदी करणार नाही. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सादर करावा अशा सूचना देत औषधांची मागणी, पुरवठा व वापर यांची सांगड घालणारे मोड्युल तयार करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या