‘नीट’ परीक्षेसाठीची केंद्र वाढवणार, जावडेकरांची घोषणा

28
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितांचा विचार करत केंद्र सरकारनं ‘नीट’ परीक्षेसाठी राज्यात प्रत्येक विभागाला एक केंद्र देणार असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह देशभरात लाखो विद्यार्थी ‘नीट’ची परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्यातून यंदा ३ लाख विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
राज्यात ‘नीट’ परीक्षेसाठी केंद्र वाढवण्याची मागणी यापूर्वी अनेक खासदारांनी केंद्र सरकारला केली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या मागणीचा विचार करत केंद्र सरकारनं राज्यात प्रत्येक विभागात एक केंद्र देण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात परीक्षा केंद्रात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या