मीडियावर सरकारचा दबाव

15
anna-hazare

सामना प्रतिनिधी । नगर

दिल्ली येथे २३ मार्चपासून होणाऱया भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडे माध्यमांचे लक्ष नसल्याचा आरोप करतानाच माध्यमांवर सरकारचा दबाव नाही ना, असा संशय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आणि शेतकऱयांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन करण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला होता. गेल्या दोन महिन्यांपासून अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत दौरा करून कार्यकर्त्यांची फळी उभी केली.

आपली प्रतिक्रिया द्या