अवकाळीच्या संकटात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे; थोरात यांचं स्पष्ट मत

balasaheb-thorat

राज्यातील अनेक भागात पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झालेला असून सोयाबीन, कापसाची परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे वक्तव्य माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज केले.

नगर येथे काँग्रेस कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आता शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न मदतीचा उभा ठाकला आहे. या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेत तात्काळ मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले.

रविशंकर यांनी राहुल गांधींवर माओवादी असल्याची टीका केली होती. या संदर्भामध्ये थोरात त्यांना विचारल्यावर कोणी काही बोललं त्याला काही अर्थ नाही, काँग्रेस हा विचार आहे, राहुलजी काँग्रेसच्या विचाराने काम करत आहेत ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून ते तीन हजार पाचशे साठ किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे, पाई प्रवास त्यांनी केलेला आहे त्यांनी सर्व देशाला जोडले आहे. बेरोजगारी महागाई यावर त्यांनी आवाज उठवला, भाजपला हे विचार माओवादी वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे ते म्हणाले.

नुकतेच मंत्री केसरकर यांनी काँग्रेस व इतर विषयांवर टीका केल्यावर त्यांना विचारल्यावर त्यांनी केसरकर आता नव्या प्रवक्ते झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावत ते वाटेल तसे बोलतात अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.