बेकायदेशीररीत्या हडप केलेल्या देवस्थानांच्या जमिनी ताब्यात घेणार

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप करणाऱयांना चाप बसणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने आदेश महसुली प्राधिकारी व अधिकाऱयांना अशा देवस्थानांच्या जमिनीचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा जमिनी आढळल्यास योग्य ती कारवाई करून त्या तत्काळ ताब्यात घेणार आहेत.

देवस्थानांच्या जमिनीसंदर्भात राज्य सरकारने आदेश काढले आहेत. बेकायदेशीर हस्तांतरणाची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सरकारला सहा महिन्यांमध्ये न्यायालयाला अहवाल द्यावा लागणार आहे. जर देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप केल्या असतील तर त्या तत्काळ देवस्थानांच्या ताब्यामध्ये देण्यात याव्यात. जोपर्यंत या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत त्या शासनाच्या ताब्यात राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या