#MaharashtraPolitics – राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची शिफारस!

2073

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांच्या शिफारसीनुसार घडले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ असेल.

दरम्यान, राज्यपालांनी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते. मात्र आवश्यक बहुमत नसल्याचे सांगत भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेने आमंत्रण दिले, मात्र बहुमताचे पत्र दाखवण्यासाठी फक्त 24 तास दिले.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम; काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

शिवसेना दिलेल्या वेळेस सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर पोहोचली मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत मग्शूल असल्याने पाठिंब्याची पत्र वेळेत मिळाली नाही. शिवसेनेने वेळ वाढवून मागितली मात्र राज्यपालांनी ही मागणी फेटाळली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राजभवनावर भेटीसाठी बोलावून सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आणि आज मंगळवार साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या