लोकांचा बँकांवरील विश्वास उडत चाललाय, राज्यपाल कोश्यारी यांची खंत

401

मुंबईतील अग्रगण्य बँक बुडीत निघाल्यानंतर लोकांचा बँकिंग क्षेत्रावरील विश्वासच उडत चालला आहे. हा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्षात बँकिंग क्षेत्र वाढत चालले असले तरी त्यात कमाईचा उद्देश दिसून येतो, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज व्यक्त केली. कल्याण जनता सहकारी बँकेच्या वतीने संचालक समाजसेवा निधी पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

‘त्यानिमित्ताने केसी गांधी ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. बँकिंग क्षेत्राबद्दल आपली सडेतोड मते मांडताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात सर्वात पुढे आहे. पण सरकार, सहकार आणि संस्कार यात संस्कार अतिशय महत्त्वाचा असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवण्याची गरज आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष ऍड. सुरेश पटवर्धन, पुरस्कार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या