आपली तब्येत अगदी ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

730

आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमात काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक तपासण्या केल्या असून त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाची कोणतीही लक्षणे आपल्यात आढळलेली नाहीत.

आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.तसेच आपण स्व-विलगीकरणात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या