‘हिरो नंबर 1’ ची पुन्हा एन्ट्री, गोविंदाचा डान्स व्हिडीओ व्हायरल

अभिनेता गोविंदा याचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफाम व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गोविंदाने ट्विटरवर शेअर केला आहे. एका जाहिरातीच्या जिंगलवर गोविंदा डान्स करताना दिसत आहे. या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे की, एका टीमला एक अभिनेता हवा असून त्यासाठी ते ऑडिशन घेत आहेत. यातच गोविंदा ऑडिशन देत असताना डान्स करत असल्याचे दिसत आहे.

गोविंदाचा हा डान्स व्हिडीओ पाहून त्याचे चाहते फारच खुश झाले आहेत. त्याचे अनेक चाहते त्याचा हा व्हिडीओ मोठ्या संख्येने लाईक आणि शेअर करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे की, ऍड नंबर 1 आला आहे, काही फरक पडत नाही या जाहिरातीतून काय म्हणायचं आहे.’

या जाहिरातीमध्ये गोविंदा यलो जॅकेट आणि ब्राऊन पँट घालून नाचताना दिसत आहे. एका नेटकाऱ्याने गोविंदाचे कौतुक करत लिहिलं की, “गोविंदा खरोखरच एक उत्तम अभिनेता असून तो सध्या सरळ स्वभावाचा व्यक्ती आहे. तू कोणतीही भूमिका खूप सहजतेने करतोस. प्रत्येक सिन अविस्मरणीय बनवतोस. तुझ्या हास्याने प्रत्येकाचं मन जिंकतोस.”

आपली प्रतिक्रिया द्या