चिनी मोबाईल वैयक्तिक माहिती चोरतात? सरकारची नोटीस

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ओप्पो, व्हीओ, शाओमी आणि जिओनी या चिनी मोबाईल कंपन्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ग्राहकाची खासगी माहिती चोरतात असा संशय केंद्र सरकारला आला आहे. या प्रकरणी सरकारने हँडसेट तयार करणाऱ्या सर्व चिनी मोबाईल कंपन्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.

हिंदुस्थानमध्ये स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने चिनी कंपन्या आहेत. त्यामुळे सरकारने मोबाईल कंपन्यांच्या विषयात प्राधान्याने लक्ष घातले आहे.

चिनी कंपन्यांसोबत काही इतर मोबाईल कंपन्यांनाही सरकारने नोटीस पाठवली आहे. यात अॅपल, सॅमसंग आणि हिंदुस्थानच्या मायक्रोमॅक्ससह अन्य २१ कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

नोटीस पाठवण्यात आलेल्या कंपन्यांना सरकारने जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र कंपन्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना मोठा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या