शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत आणि सरकारी नोकरी!

केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या दरम्यान 50 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारने मदत जाहीर केली आहे.

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान 76 शेतकऱ्यांनी प्राण गमावला आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीची घोषणा, अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

देशात राज्यघटना आहे का?

देशात राज्यघटना आहे का? असा सवाल कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केला आहे. राज्यघटनेतील स्केड्यूल 7 प्रमाणे शेती हा राज्याच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. केंद्र सरकारने संसदेत चर्चा न करता कायद्यांमध्ये बदल कसा केला? लोकसभेमध्ये त्यांनी संख्याबळाच्या जोरावर हे विधेयक मंजूर केले, परंतु राज्यसभेमध्ये मात्र अत्यंत गोंधळाच्या स्थितीत हे मंजूर करण्यात आले, असेही कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सिमांवर बसले आहेत. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्या एकामागोमाग एक बैठका होत आहे. आज देखील चर्चेची अकरावी फेरी पार पडली मात्र यातून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. आजच्या बैठकीनंतर पुढील बैठकीची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या