घसादुखीमुळे क्लिनिकमध्ये गेली, डॉक्टरने महिलेला शर्टाखालून भलतीकडेच हात लावला

स्कॉटलैंडच्या ओबाना भागातील डॉ.कॉलिन विल्सन यांचं नाव वैद्यकीय रजिस्टरमधून काढून टाकण्यात आलं आहे. 35 वर्ष डॉक्टरी करणाऱ्या कॉलिन यांच्यावर गंभीर स्वरुपाचा आरोप करण्यात आला होता. कॉलिन याच्याविरूद्ध एक तक्रार करण्यात आली होती, ज्याची सुनावणी एका लवादासमोर करण्यात आली होती. लवादाने डॉक्टरने चूक केली असल्याचं सांगत त्याने केलेलं कृत्य हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं असल्याचं म्हटलंय. कॉलिन याने त्याच्या पेशाचा गैरवापर केल्याचंही लवादाने म्हटलं आहे.

कॉलिन याच्याकडे एक महिला घसा दुखत असल्याने गेली होती. नीट श्वास घेता येत नसल्याची आणि छातीमध्ये कफ साठल्याचीही तिची तक्रार होती. ही महिला तिच्या लहान मुलासह क्लिनिकमध्ये गेली होती. कॉलिनने या महिलेला तपासायला सुरुवात केली. तपासणीच्या नावाखाली त्याने तिच्या शर्टाखालून हात घातला आणि नको तिथे घट्ट स्पर्श केला. यानंतर त्याने स्वत:च्या गुप्तांगालाही हात लावला अशी तक्रार महिलेने केली होती. या प्रकारामुळे भेदरलेल्या महिलेने तिथून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि नंतर पोलिसांतही तक्रार केली. कॉलिनने पोलिसांना त्याच्या बचावासाठी सांगितलं होतं की तो तिची छाती तपासत होता. मात्र वैद्यकीय सेवा लवादाने त्याचा हा तर्क अमान्य केला. पीडितेने खोकल्याची तक्रार केली नव्हती मग कॉलिनने तिची छाती का तपासली असा प्रश्न लवादाने उपस्थित केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या