
राज्यात नाशिक अमरावती विभागात होणाया पदवीधर तसेच संभाजीनगर, नागपूर आणि कोकण मतदारसंघात होणाऱया शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजले आहे.
राज्यात पुढील वर्षी होणाऱया शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरद दळवी उपस्थित होते. त्यानुसार येत्या 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान अर्ज करता येणार असून या मतदारसंघाची प्रारुप यादी 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात.
एकगठ्ठा अर्जाचा विचार नाही
या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान पेंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱया अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.