फुलंब्री तालुक्यातील कान्होरीत 15 वर्षांनंतर भाजपचा सुपडा साफ, सर्व जागांवर शिवसेना विजयी

संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील धामणगाव, पाल, पिंपळगाव वळण, कान्होरी, बोधेगाव (बु.), शिरोळी (बु.), बोरगाव अर्ज, वाकोद, दरेगाव दरी, आणि रिधोरा येथे शिवसेनेचे पॅनल निवडून आले. बोधेगाव (बु.) येथे सातपैकी सातही सदस्य शिवसेनेचे निवडून आले.

कान्होरी गावात 15 वर्षांनंतर सत्ता बदल झाली असून, भाजपचा सुपडा साफ झाला आहे. या गावात त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. 9 सदस्य असलेल्या कान्होरी ग्रामपंचायतीत सर्वच सर्व शिवसेनेचे 9 सदस्य निवडून आले.

पाल या गावात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वात 13 जागांसाठी पॅनल उभे होते. त्यापैकी 12 जागा शिवसेनेला मिळाल्या. वाकोद येथे शिवसेनेचे 7 पैकी 5 शिवसेनेचे सदस्य निवडून आले. वारेगाव येथे 13 पैकी महाविकास आघाडीचे 12 उमेदवार विजयी झाले.

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचे एकहाती वर्चस्व, खानापूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

बोरगाव अर्ज येथे शिवसेनेचे सभापती किशोर बलांडे यांचे पॅनल विजयी झाले. रिधोरा येथे महाविकास आघाडीचे 5 सदस्य विजयी झाले. त्यातील 3 सदस्य शिवसेनेचे आहेत.

रत्नागिरी तालुक्यात 41 पैकी 34 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा, भाजपचा धुव्वा

आपली प्रतिक्रिया द्या