माजी आमदार अण्णासाहेब मानेंच्या पॅनलचा पराभव, गंगापूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात

गंगापूर तालुक्यातील 71 ग्रामपंचयातींपैकी 31 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यात 71 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यातील 2 ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत.

राहिलेल्या 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाप्रमुख लक्ष्मन सांगळे, अविनाश पाटील, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, विभागप्रमुख सुभाष कानडे, उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आदींनी परीश्रम घेत शिवसेनेच्या शिवशाही पॅनलने 29 ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.

यात लक्ष वेधी ठरलेल्या जामगाव येथील माजी आमदार अण्णासाहेब माने व गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कुंडलिकराव माने यांच्या पॅनलचा उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे यांच्या नेतृत्वात शिवशाही पॅनलने धुव्वा उडवला.

फुलंब्री तालुक्यातील कान्होरीत 15 वर्षांनंतर भाजपचा सुपडा साफ, सर्व जागांवर शिवसेना विजयी

आपली प्रतिक्रिया द्या