‘रुपे कार्ड’ भूतानमध्येही चालणार, पंतप्रधान मोदींचे अभूतपूर्व स्वागत

1361

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौर्‍यावर असून आज त्यांच्या हस्ते भूतानमध्येरुपे कार्डलाँच करण्यात आले. हिंदुस्थान आणि भूतानचे संबंध पूर्वीपासूनच घनिष्ठ असे राहिलेले असून या रुपे कार्डमुळे ते आणखीन दृढ होतील. तसेच या कार्डमुळे दोन्ही देशांतील व्यापारात मदत मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाल्यावर तिथे पंतप्रधानांचे अभूतपूर्व असे स्वागत झाले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजारो मुले आणि महिला हातात हिंदुस्थानी तिरंगा ध्वज आणि भूतानचा झेंडा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारेच होते. भूतानी लष्कराने मोदी यांच्या सन्मानार्थ पारो विमानतळावर त्यांनागार्ड ऑफ हॉनरही दिला.

शेजारी राष्ट्र भूतानसोबतचं मैत्रीचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा दोनदिवसीय भूतान दौरा आजपासून सुरू झाला. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे तर पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या टर्ममध्ये ते प्रथमच भूतानमध्ये गेले आहेत. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनागार्ड ऑफ हॉनरदेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या