ट्रॅक्टरमधून मिरवणूक ते मिठाई वाटप, पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सामना प्रतिनिधी । मुंबई

जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारी शाळा पून्हा सुरू झाल्या आहेत. राज्यभरात शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध उपक्रम राबवून मुलांचे स्वागत करण्यात आले. कोणी शाळेत रांगोळी काढून, मुलांना फूले देऊन, तर काही ठीकाणी मुलांची सजवलेल्या टॅक्टर, बैलगाडी, कारमधून मिरवणूक काढून मिठाई-चॉकलेट वाटप करून जंगी स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे.

kop-school-1

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळाही सोमवारी सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने,ठिकठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील शाळेत तुतारी,बॅडबाजाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच नविन विद्यार्थ्यांना शिक्षकांसह सजविलेल्या बैलगाडीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेत नव्याने दाखल झालेल्या लहानग्या विद्यार्थ्यांचे शिक्षिकांनी औक्षण करून स्वागत केले. या मिरवणुकीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

rtn-school

रत्नागिरीत शाळेच्या पहिल्याच दिवशी वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. रोज पायपीट करून शाळेत येणाऱ्या सर्वसामन्य कुटूंबातील मुलांचे येथील भातगाव कोसबी शाळेत सजवलेल्या चारचाकी गाडीतून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताश्यांच्या गजरात, बेंजोच्या तालात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांना फुगे, चॉकलेटव आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

ppr-school
पंढरपूरातल्या घालमेपवारवस्तील्या अक्षरांगण जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांना फुगे, गुलाबपुष्प देऊन, तसेच त्यांची टॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या स्वागतामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी हरकून गेले. नारळाच्या फाद्यांनी व केळीच्या खुटांनी सजवलेल्या शाळेत शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व पालक-ग्रामस्थांनी उत्फुर्तपणे केलेल्या स्वागतांनी विद्यार्थी भारावून गेले. यावेळी सजवलेल्या टॅक्टरमध्ये हातात रंगीबेरंगी फुगे घेऊन डॉल्बीवरील बालगीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धराला.

नगर जिल्हयातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली होती. शहरातील भाऊसाहेब पिरोदीया, दादा चौधरी, कन्याविद्या मंदीर, रयत शिक्षण संस्था, सिक्रेट आर्टद कॉल्मेंट हायस्कुल, नगर एज्युकेशन सोसायटी, महात्मा पुले शाळा, मार्कंडेय शाळा, मनपाच्या शाळा, समर्थ विद्या मंदीर अशा अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

आष्टीतही उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. शाळेत आल्यानंतर विद्यार्थांना नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेत हजार झाले. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या जोरदार स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा तसेच गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

मालवणमधल्या शाळाही सोमवारी पुन्हा गजबजल्या असून नव्या शैक्षणिक वर्षांचा ‘श्री गणेशा’ झाला आहे. मालवण तालुक्यातील 195 शाळांमध्ये 658 विद्यार्थी पहिलीच्या वर्गात दाखल झाले. यावेळी शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. मालवण तालुका शिक्षण विभागात जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांची 86 पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी रिक्त जागी शिक्षकांची लवकरात लवकर नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या