२० लाखांची ग्रॅच्युईटी करमुक्त होणार

26

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अमेन्डमेन्ट बिल २०१७ हे महिनाअखेरीस सुरू होणाऱया संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. ते विधेयक मंजूर झाल्यास कर्मचारी २० लाख रुपयांची ग्रॅच्युईटी ‘करमुक्त’रीत्या मिळण्यास पात्र ठरणार आहेत. सध्या नोकरीतील सेवा काळ पाच वर्षांपेक्षा अधिक असलेल्या कर्मचाऱयांना नोकरी सोडते वेळी किंवा सेवानिवृत्ती वेळी १० लाख रुपयाची ग्रॅच्युईटी करमुक्त मिळत असते.

आपली प्रतिक्रिया द्या