विना चार्ज करता 4011KM धावली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, 6 दिवसात कन्याकुमारीहून लडाखला पोहोचली

हैदराबादमधील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी Gravton Motors च्या इलेक्ट्रिक बाईकने एक जबरदस्त विक्रम केला आहे. या बाईकने कन्याकुमारी ते खारदुंगला (लडाख) हे अंतर अवघ्या 164 तास 30 मिनिटांत (6.5 दिवस) पूर्ण केलं आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. या विक्रमाची नोंद आता एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

बॅटरी चार्ज न करता प्रवास केला पूर्ण

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचा हा प्रवास 13 सप्टेंबर 2021 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाला आणि 20 सप्टेंबर 2021 रोजी खारदुंगला येथे पूर्ण झाला. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक दुचाकी बॅटरी चार्जिंगसाठी कुठेही थांबली नाही. याबाबत बोलताना कंपनीने सांगितले की, बाईक स्वॅप करण्यायोग्य बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने टीमने कोणतेही चार्जिंग स्टॉपशिवाय हे अंतर पूर्ण केले आहे.

मिळते 320 किमीची रेंज

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3KW ची मोटर देण्यात आली आहे, जी 172 Nm टॉर्क जनरेट करते. यात सिटी, स्पोर्ट्स आणि इको असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इको मोडमध्ये ही बाईक 150 किमी पर्यंत धावू शकते. तसेच ड्युअल बॅटरीसह ही बाईक 320KM पर्यंत धावू शकते.