आवर्जून अभ्यासावी अशी थोरवी

140

<<  संगीत सान्निध्य >>         << सारंगी आंबेकर >>

प्रो. बी. आर. देवधरांची ओळख संगीत जगतात गायक, संगीतज्ञ, गुरू अशी आहे. हिंदुस्थानी संगीतात दुर्लक्षिले गेलेले अनेक पैलू देवधरांनी आत्मसात केले. त्यांच्या ‘थोर संगीतकार’ या पुस्तकात निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. अशा थोरवींचा अभ्यास मांडणारा हा लेख.

शास्त्रीय संगीतासारख्या अमूर्त कलेला जाणून घेण्यासाठी, तिचे आकलन होण्यासाठी व तिची साधना करण्यासाठी गुरूचं अस्तित्व अनिवार्य आहे. काही शिष्य अर्जुनाचं तर काही एकलव्याचं संचित घेऊन येतात. रुबरू तालीम व सहवास याचं माहात्म्य वादातीतच, पण त्यातील मर्यादांना आपल्या लेखणीने मात देणाऱया संगीतज्ञांमध्ये प्रो. बी. आर. देवधर यांचे कार्य अग्रणीय आहे.

१९७३ साली आलेल्या प्रो. बी. आर. देवधरांच्या ‘थोर संगीतकार’ या पुस्तकात १९४८ ते १९५८ दरम्यान त्यांनी लिहिलेल्या ‘संगीत कलाविहार’मधील निवडक व्यक्तिचित्रांचा संठाह आहे.

मिरज येथे ११ सप्टेंबर १९०१ रोजी जन्मलेल्या देवधरांची ओळख संगीत जगतात गायक, संगीतज्ञ, गुरू अशी आहे. १९६४ साली मिळालेल्या ‘संगीत नाटक अकादमी’ फेलोशिप, १९७६ साली हिंदुस्थान सरकारच्या ‘पद्मश्री’ सन्मानांनी त्यांचा यथोचित गौरव झालेला आहे. ग्वाल्हेर, किराणा, आठा, जयपूर, पतियाळा या सर्वच घराण्यांतील बुजुर्गांकडून तालीम व सहवास लाभल्यामुळे गाण्यातील सहिष्णुता व नजर विस्तारायला त्यांच्या मूळच्या चिकित्सक प्रवृत्तीने हातभार लावला असणार हे सांगणे न लगे.

पुस्तकाला लाभलेली पु.लं.ची प्रस्तावना देवधरांच्या सम्यक दृष्टीशी वाचकांचा परिचय करून देण्यात सहाय्यक ठरते. ”या महान कलाकारांना पाहण्याचा योग न आलेले संगीत रसिक त्यांना ते दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद देतील. ज्यांनी त्यांना पाहिले आणि ऐकले आहे त्यांच्या आठवणी उचंबळून येतील.” पु.लं.चा निर्देश भावी पिढीतील अभ्यासू व रसिकांनी संगीताच्या वारीतील ही तीर्थक्षेत्रे देवधरांच्या मार्गदर्शनाने पाहावीत असाच असावा. गायनाचार्य पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्यापासून पुस्तकातील लेखमालेची सुरुवात होते. आपल्या गायनकलेने आकाशाला गवसणी घालणाऱ्या मागच्या पिढीतील सर्वच कलाकारांच्या विधिलिखितात मात्यापित्यांचे छत्र हरपणे, क्षीण आर्थिक परिस्थितीजन्य अडचणी, दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे अथक परिश्रमांची तयारी, गुरूची कृपादृष्टी लाभेपर्यंत ससेहोलपट इत्यादी वक्री स्वरांची खैरात झालेली दिसते.

बाळकृष्णबुवांनीही देवजी बुवा, महमद खाँसाहेब, वासुदेवराव जोशी यांच्याकडून तालीम हासील केली. डाव्या हाताने स्वत:च डग्गा वाजवून व उजव्या हातात तंबोरा घेऊन ते तासन्तास मेहनत करीत किंवा एकदा त्यांना सांगलीच्या उत्सवात चांदीच्या रुपयांत मिळालेली बिदागी मोजण्याची लहर आली. एकदा रुपये पन्नासपेक्षा जास्ती झाले तर एकदा कमी भरले. तेव्हा त्यांनी तो नाद सोडत आपल्या विद्यार्थ्याला सांगितले, ”हे रुपये मोजून घे, जास्त असतील तर परत कर. कमी असतील तर मागून घे.” अशा स्वच्छ मनाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या अस्सल गाण्यामुळे अल्लादियाँ खाँसाहेब, अब्दुल करीम खाँसाहेब, भास्कर बुवा, रामकृष्ण बुवा ही मंडळी बुवा सभेमध्ये आल्यावर उठून उभी राहत. त्यांनी घडवलेल्या शिष्यांमध्ये पुत्र अण्णा बुवा ज्यांच्या अकाली निधनाने बुवांची विद्याही निवर्तली व दिग्विजयी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे त्यांच्या कलातपस्येचे स्मारक होय.

पेचदार गायकीचे उद्गाते मरहूम अल्लादियाँ खाँसाहेबांवरील दुसरा लेख जयपूर गायकीचा उगम व आजपर्यंत ज्या संगीतकारांविषयी संगीत जगतात गूढ आकर्षण टिकून आहे अशांपैकी एक म्हणजे स्वत: अल्लादियाँ खाँसाहेबांविषयीच्या प्रवादांचा त्यांच्या गायकीतील सौंदर्यस्थळांइतकाच न्याय्य परामर्ष घेतो. खाँसाहेबांना प्रत्यक्ष ऐकलेल्यांपैकी लिहिताना देवधर हे भक्तीचा मळा फुलवणाऱ्यांपैकी नसून त्यांच्या गायनी कळा व त्यांची कारणमीमांसा नि:पक्षपणे मांडतात. चुलते जहांगीरखाँ यांच्याकडून मिळालेली धृपदधमाराची तालीम, मुबारक अल्लीखाँची हुकलेली तालीम, पुढे आवाज बसल्यानंतर मूळच्या गायकीला दिलेले वळण व मैफीलीतील मांडणी, शिष्यांमार्फत गायकीचा प्रसार हे सर्व आदर व तथ्य यांचा मेळ दाखून सागता येणं यात देवधरांचं यश आहे.

यानंतरच्या लेखाच्या स्थानावरूनही पं. वि. ना. भातखंडे यांच्या भगीरथ कार्याची महती पटावी. गुरू गायनविद्येचा प्रसार करताना गायनप्रस्तुती व तालीम या दोन मुख्य मार्गांचा अवलंब करतो. मात्र प्रत्यक्ष मैफील गायक व्हायचे या उद्देशाशी फारकत घेऊन संगीत कलेची जोपासना केवळ गवैयांसाठीच नाही तर संलग्न कला शाखांतील विद्यार्थी, जाणकार, रसिकांसाठी कायमस्वरूपी असावी म्हणून शास्त्राधार व प्रचलित कलास्वरूप यांचा मेळ घालणारे मौलिक ज्ञान गंथरूपाने प्रसिद्ध करणे, त्यासाठी पदरमोड करणे, प्रसिद्धीपराड़मुखता, वाट्याला येणाऱ्या टीकेची झोड वागवत आपले कार्य सुरू ठेवणे याचा आदर्श म्हणजे ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती’ व पं. वि. ना. भातखंडे. प्रसंगी तऱ्हेवाईकपणाचा अनुभव घेऊनही त्या मागची कळकळ, संशोधनवृत्ती व सच्चा माणूस याचा देवधरांनी करून दिलेला परिचय मननीय आहे.

‘थोर संगीतकार’ हे पुस्तक देवधरांना ज्या दोन आदरणीय संगीतकार गुरूंना अर्पण केले आहे त्यापैकी एक प्रो. जिओवानी क्रिंझी यांच्यावरचा लेख ‘मर्मबंधातली ठेव’ असल्याप्रमाणे उतरला आहे. विष्णू दिगंबरांच्या अनुज्ञेने पाश्चात्त्य संगीतासाठीची शिष्यवृत्ती देवधरांना मिळणे व त्यानंतर गणितज्ञ, संगीतकार, रचनाकार प्रो. स्क्रिझींचा गुरू म्हणून सहवास मिळणे यामुळे देवधरांच्या पाश्चात्ये संगीत अभ्यासाचा पाया सखोल झाला व क्रिंझीच्या शिक्षण पद्धतीमुळे वाद्य हाताळण्याची रीत, भावनामय संगीत, आवाज बनवण्याचे शास्त्र यातील हिंदुस्थानी संगीतात दुर्लक्षिले जाणारे अनेक पैलू देवधरांनी आत्मसात केले. ‘सर्वच ज्ञान एकाच व्यक्तीत अगर घराण्यात साठवलेले नसते तर अनेक ठांथांतून व गुरुजनांकडून ते मिळवायचे असते ही गोष्ट प्रो. स्क्रिझी यांनीच माझ्या ध्यानात आणून दिली.’ देवधरांनी संगीतातील घराणी किंवा भिन्न संगीतपद्धतींमधील आपपरभाव किती तकलादू आहे हे सांगण्यासाठी घातलेले इतके अंजन पुरेसे आहे.

(क्रमशः)

 

आपली प्रतिक्रिया द्या